Wednesday 7 October 2015

श्रीमंत होण्याचे पाच सोपे उपाय

 श्रीमंत होणं ही एक सुद्धा कला आहे, श्रीमंत होण्यासाठी जगातली कोणतीही जादू काम करत नाही. काही वेळा काही सवई बदलणे, आणि रूटीननुसार यात बदल केले तर श्रीमंत होण्याच्या जवळ तुम्ही येतात, श्रीमंत लोक त्यांच्या नशिबाने पैसा कमवत नाहीत, ते एक चांगलं नियोजन करून आपल्या कामातून पैसे मिळवतात.
आपलं लक्ष केंद्रीत करा
एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी हे गरजेचं आहे की आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आपलं लक्ष्य ठरवा, एकावेळी टार्गेट ठरवल्यानंतर त्याच्यासाठी जोरदार काम करा. यश मिळाल्यानंतर आपण आपल्या पायावर उभे राहिल्याचं तुम्हाला लक्षात येईल, एका शोधानुसार जगातील ८० टक्के श्रीमंत लोकं अशी आहेत, ज्यांनी एकमात्र लक्ष्य ठेवून ते मिळवण्यासाठी अचूक मेहनत केली.
आपल्या विषयात पारंगत व्हा
आपल्या विषयात पारंगत होण्यासाठी त्या विषयाशी संबंधित जास्तच जास्त वाचा, म्हणतात की माहिती हीच खरी शक्ती आहे. ज्यास्तच जास्त पुस्तकं वाचल्याने तुमची माहिती वाढेल, नको त्या गोष्टीवर वेळ खर्च करू नका, मात्र तुमची सामाजिक बांधिलकी विसरा असा त्याचा अर्थ होत नाही.
आपलं भविष्य आपल्याच हातात आहे
समय से पहेले और भाग्य से अधिक कुछ नही मिलता, अशा गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागणार आहे, दे रे हरी खाटल्यावरी, असं होणार नाही, मेहनतीने मिळवावं लागेल, यशाचे शॉर्टकट्स नसतात.
बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष द्या
बऱ्याचं वेळा आपल्या कमाईची रक्कम आपण अशीच उडवून देत असतो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर उधळपट्टीची सवय बंद करा, कदाचित हेच पैसे तुमचं भविष्य घडवण्याच्या कामी येतील. दर महिन्याला आपल्या मिळकतीच्या २० टक्के वाचवा, असं केल्याने तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकतात.
संधी दवडू नका
श्रीमंत व्यक्ती आपल्या कमाईवर फोकस करतो, त्याचं लक्ष विचलित होत नाही, वेळ हाच त्याच्यासाठी पैसा असतो, कॉमन मॅन फक्त त्याच्या वेळेवर फोकस करतो. जास्तच जास्त लोक लहान-लहान गोष्टी जुळवण्यात लागलेले असतात. श्रीमंत होण्यासाठी पूर्णशक्ती त्याच ठिकाणी लावा, जी गोष्ट तुम्हाला श्रीमंत बनवू शकते.



for more guidance contact-8421062857


No comments:

Post a Comment